राष्ट्रीय धावपटू संजय मोती यांचा सत्कार जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स पंच प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न 

जळगाव – :जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स पंच प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप रावेर तालुक्यातील निसर्गरम्य अश्या पाल येथे झाला कार्यशाळेचा समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ नारायण खडके तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय खेळाडू नायब तहसीलदार अनिल पठाडे, ग.स.सोसायटीचे संचालक अजय देशमुख, राष्ट्रीय खेळाडू बन्सीआप्पा माळी, जिल्हा क्रिडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ पी आर चौधरी, उपाध्यक्ष प्रा ईकबाल मिर्झा, जेष्ठ समाजसेवक अशोक कोल्हे, मुख्याध्यापक के यु पाटील, डॉ चांदखान पठाण यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांनी केले दोन दिवसीय कार्यशाळेत डॉ पी आर चौधरी, राजेश जाधव व प्रा वसीम मिर्झा यांनी सखोल मार्गदर्शन केले याप्रसंगी भुपेंद्र पाटील व योगेश साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेस सातपुडा विकास मंडळ व कृषी विज्ञान केंद्र पाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यशाळेत जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे जिल्ह्यातील संलग्न ७५ पंच तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष व सचिव सहभागी झाले आहेत.