2,000 ची नोट गेली आता ₹75 चे नाणे येणार, नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त केंद्र सरकारचे गिफ्ट

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या स्मरणार्थ ₹ 75 चे नाणे लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या नाण्यावर नवीन संसद भवनाच्या चित्रासह ‘संसद परिसर’ असे लिहिलेले असेल.

₹75 चे नाण्याचा 44 मिमी व्यास असेल आणि त्याच्या काठावर 200 पट्टे असतील. असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे. नव्या संसदेचा उद्घाटन 28 मे रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, नव्या 75 रुपयांच्या नाण्याचे वजन 35 ग्रॅम असेल आणि त्यात 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे आणि 5-5 टक्के निकेल आणि जस्त धातूचे मिश्रण असेल. नवीन संसदेच्या चित्राच्या खाली 2023 हे वर्ष देखील लिहिलेले असेल.

या नाण्याचे भारत सरकारच्या कोलकाता टांकसाळीत केले जाणार आहे. अशोक स्तंभ आणि सिंहाची मुद्रा नाण्याच्या मध्यभागी असेल आणि त्याच्या खाली ‘सत्यमेव जयते’ लिहिलेले असेल. नाण्याच्या डाव्या बाजूस देवनागरी लिपीमध्ये भारत आणि इंग्रजीमध्ये भारत लिहिलेले असेल.

याशिवाय नाण्याच्या वरच्या परिघावर देवनागरीत संसद भवन असे लिहलेले असेल आणि खालच्या परिघावर इंग्रजीमध्ये संसद भवन लिहिलेले असेल. नाण्याची रचना राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी होणाऱ्यानवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाला 18 NDA घटकपक्ष आणि 7 गैर NDA पक्षांसह किमान 25 पक्ष उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर 21 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.

दरम्यान ,BI ने मागील काही दिवसांपूर्वी दोन हजार रूपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला असून, 23 मेपासून नोटा मागे घेण्यास सुरूवात झाली आहे.