युट्यूब चॅनल सबस्क्राइब करताय? सावधान!; अन्यथा तुमचंही बँक खातं होईल रिकामं

पुण्यातून फसवणुकीची एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या सोशल मीडियाच्या युगात अनेकांचे स्वतंत्र युट्यूब चॅनल आहे. या चॅनल मार्फत व्यक्ती बक्कळ पैसे देखील कमवत आहेत.

अशात आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, असं तुम्हाला आजवर अनेकांनी सांगितलं असेल. पुण्यात अशा प्रकारे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केल्याने एका व्यक्तीला तब्बल ९ लाखांचा गंडा बसला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुण्यातील हडपसर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या एका तरुणाला तीन युटयूब चॅनल सबस्क्राइब करण्यास सांगून त्याची ९ लाख रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप व टेलिग्रामच्या माध्यमातून या तरुणाशी संर्पक करण्यात आला होता. विक्रम बाळासाहेब जमदाडे असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.

तीन अनोळखी आरोपी विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शुभांगी रुथ, गौतम गोल्ड फायनान्स व आराध्या अग्रवाल अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हा सगळा प्रकार 14 ते 31 मार्च दरम्यान घडला. तक्रारदार विक्रम यांना संबंधित आरोपींनी संगनमत करुन व्हॉट्सअॅप तसेच टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून संर्पक साधला.

यांनी तरुणासोबत चॅटिंगच्या माध्यमातून चर्चा केली. आम्ही नवीन युट्यूब चॅनल सुरु केलं आहे. ते सबस्क्राइब करा. आम्हाला मदत करा. चॅनल सबस्क्राइब केल्याने तुम्हाला आकर्षक बक्षिसे मिळतील. असे सांगून या तरुणाकडून तीन युटयूब चॅनल सबस्क्राइब करुन घेण्यात आलेत. आरोपींनी या तरुणाचे युपीआय आयडी मिळवले. नंतर बँक खात्यातून एकापाठोपाठ एकूण आठ लाख 97 हजार रुपये भरण्यास सांगीतले. तरुणाने गुंतवलेले पैसे परत न करता त्याची फसवणूक करण्यात आली आहे.

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh