बागेश्वर बाबाच काय, तुम्ही मनातलं ओळखू शकता? कसा केला जातो हा प्रकार वाचा

मुंबईतील माइंड रीडर सुहानी शाह हिने एका शो दरम्यान प्रेक्षकांसोबत थेट चाचण्या केल्या. शोमध्ये मनात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार त्या एका पाटीवर लिहून ठेवत होत्या.

मग त्या व्यक्तीला त्याने काय विचार केला होतो, ते विचारुन पाटीवरील उत्तर दाखवत होते. दोन्ही गोष्टी अगदी सेम टू सेम येत होत्या.

सुहानी काय म्हणते

बागेश्वर धाम जे करतात तेच सुहानी शाह करत आहे. आपल्याजवळ असलेली ही देण एक कला व ट्रिक असल्याचे ती सांगते. मी सराव करुन तिला अधिक विकसित केले आहे. ही कला आपण कोणालाही शिकवण्यास तयार असल्याचे तिने स्पष्ट केले.

माईंड रिंडिंग पॅशन

सुहानी शाह म्हणते, लहानपणापासून माईंड रिडिंगचं मला पॅशन होतं, ते मी पूर्ण केलं, मी पहिलीची शिकली असली, तरी मी या कलेवर पुस्तकं लिहिली आहेत. कारण देशभर फिरत असताना अनेक लोकांशी भेटीगाठी आणि संवाद झाले यात भाषेचं ज्ञान मिळालं. मी माझी इंग्रजी अधिक सुधारण्यावर अजुनही भर देत आहे. भारतात सोशल मीडियावर बाबा धीरेंद्र नंतर सुहानी शाह चर्चेत आली आहे, तिच्या या कलेमुळे.

कोण आहे सुहानी शाह

सुहानी शाह प्रसिद्ध माइंड रीडर आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून लोकांच्या मनात काय सुरु आहे, ते ओळखण्याचे काम त्या करत आहेत. यासंदर्भात तिने अनेक लाईव्ह शो केले आहेत. फक्त पहिलीपर्यंत शिक्षण सुहानीचे झाले आहे. ६० विद्यार्थ्यांसोबत राहण्यापेक्षा ६० हजार लोकांसमोर कार्यक्रम घेण्याचा तिच्या वडिलांनी सल्ला दिला. त्यानंतर शाळा सोडली अन् लाईव्ह शो करुन लोकांचे मन ओळखू लागल्या.