‘बिचाऱ्याला कुठंही उभं करा दिसतो गरीबच!’ केजरीवालांची उडवली खिल्ली

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांच्या साखरपुड्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. यासगळ्यात मात्र केआऱकेच्या ट्विटनं लक्ष वेधून घेतले आहे.

त्याचे ते व्टिट अनेकांसाठी रागाचे कारण ठरताना दिसत आहे.

कमाल राशिद खाननं केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. त्यानं राघव आणि परिणीतीच्या त्या सोहळ्यातील तो फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री देखील दिसत आहे. तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत केआरकेनं दिल्लीचे मुख्यमंत्री यांच्यावर टीका केली आहे. या माणसाला कुठंही उभं करा तो गरीबच दिसतो. अशा शब्दांत त्यानं केजरीवालांची टिंगल केली आहे. यावर केआरकेला नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे.

केजरीवालांना राघव परिणीतीच्या सोहळ्यात सहभागी होत त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला होता. तुम्हा दोघांची जोडी भलतीच सुंदर दिसते आहे. केआरकेनं मात्र केजरीवाल यांच्यावर केलेल्या टीकेनंतर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यालाही नेटकऱ्यांनी चांगलेच झापले आहे. ते दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत पण तू कोण आहेस असा प्रश्न विचारला आहे.

राघव-परिणीतीच्या साखरपुड्याला राजकाण्यांची हजेरी…

राघव चढ्ढा आणि परिणीतीच्या साखरपुड्याला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत अनेक राजकारणातील, समाजकारणातील आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रानं देखील आपल्या लाडक्या बहिणीच्या साखरपुड्यामध्ये केलेली वेशभूषा चर्चेत होती.

राघव चढ्ढा कोण आहेत….

राघव चढ्ढा हे आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार आहेत. २०१२ मध्ये त्यांनी आप पक्षामध्ये प्रवेश केला होता. बॉलीवूडची अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत त्यांचे नाव घेतले गेल्यानंतर ते जास्त चर्चेत आले. तोपर्यत त्यांची ओळख राजकारण आणि समाजकारण पुरती मर्यादित होती. परिणीतीसोब डेटिंगचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

राघव राजकारणात येण्यापूर्वी चार्टर्ड अकाउंट होते. त्यांनी २०१६ मध्ये काही काळ मनीष सिसोदिया यांचा सल्लागार म्हणून कामही केले आहे. राघव यांनी आप पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची पक्षाचे खजिनदार म्हणून निवड केली होती.