सुनसगाव – नशिराबाद दरम्यान वाघुर नदीच्या पुलावर पडले मोठमोठे खड्डे !

सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – राज्य मार्ग क्रमांक १९० नशिराबाद – बोदवड – मलकापूर या रस्त्यावर सुनसगाव वाघुर नदीच्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून या ठिकाणी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे लवकरात लवकर खड्डे बुजण्याची मागणी केली जात आहे.

गेल्या दोन वर्षांपासून या पुलावर खड्डे पडले आहेत त्यामुळे अगोदरच या पुलाचे लोखंडी कठडे तुटलेले आहेत त्यामुळे वाहने सांभाळून चालवावी लागत असताना पुलावरच खड्डे पडले असल्याने वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.विशेष म्हणजे या रस्त्यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे नेहमी ये – जा करीत असतात त्यामुळे अधिकाऱ्यांच्या लक्षात पुलावर खड्डे असल्याचा प्रकार लक्षात येत नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .तसे पाहता हा पूल खान्देश व विदर्भाला जोडणारा आहे त्यामुळे लवकरात लवकर खड्डे बुजण्याची मागणी केली जात असून आता काही ठिकाणी बारीक खडी आणून टाकल्याचे दिसत आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh