ठरलं! ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला, इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये पहिली लढत

आगामी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तना यांच्यात महामुकाबला कधी होणार, असा प्रश्न तमाम क्रिकेटप्रेमींना पडला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना श्वास रोखून धरणारा असतो, हे सर्वश्रूत आहे.

त्यामुळे ही रंगतदार लढत पाहण्यासाठी संपूर्ण क्रिडाविश्वातील चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आगामी होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना कधी आणि कुठे होणार, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, यावर्षी होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात होणारा सामना १५ ऑक्टोबरला होऊ शकतो. या दिवशी रविवार असल्याने सामना या तारखेला ठेवण्यात आला आहे. हा सामना जगातील सर्वात मोठ्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. रिपोर्टनुसार, वर्ल्डकप २०२३ चा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ५ ऑक्टोबरला होणार आहे. हा सामनाही नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे आणि १० नोव्हेंबरला याच मैदानात अंतिम सामनाही होणार आहे. बीसीसीआयच्या माध्यमातून लवकरच वर्ल्डकपचं शेड्यूल जाहीर केलं जाईल. सध्या सुरु असलेला आयपीएलचा हंगाम संपला की, वर्ल्डकपच्या शेड्यूलची घोषणा केली जाईल. त्यानंतर कोणता संघ कुठे खेळणार आहे, याबात माहिती दिली जाईल.

अहमदाबादमध्ये सामना खेळवण्यात पाकिस्तानचा विरोध – रिपोर्ट

क्रिकबझच्या रिुपोर्टनुसार, पाकिस्तानचा संघ भारतात येऊन वर्ल्डकप खेळण्यासाठी तयार झाली आहे. परंतु, पाकिस्तानकडून काही समस्याही मांडण्यात आल्या असल्याचं बोललं जात आहे. अहमदाबादमध्ये सामना खेळण्यात पाकिस्तानला अडचण असल्याचं समोर आलं आहे. पीसीबीचे चीफ नजम सेठी यावर शंका उपस्थित करू शकतात. पीसीबीला पाकिस्तानच्या सामन्यांच्या वेन्यूमध्ये बदल हवा आहे. जर पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचला, त्यावेळी अहमदाबादमध्येच सामना खेळवला जाईल. आतापर्यंतच्या शेड्यूलनुसार, पाकिस्तानचे सामने अमहमदाबाद, हैद्राबाद, चेन्नई आणि बंगळुरुत होणार आहेत. याशिवाय कोलकाता, दिल्ली, इंदौर, धर्मशाला, गुवाहाटी राजकोट, रायपुर आणि मुंबईत सामन्यांचं आयोजन होऊ शकतं. प्रत्येक संघ ९ लीग सामने खेळणार आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh