ना.गुलाबरावजी पाटील यांच्या सहकार्यामुळे रुग्णास मुख्यमंत्री सहायता निधीतुन मिळाली मदत”डॉ.कमलाकर पाटील यांचा यशस्वी “

जळगाव – :तालुक्यातील कठोरा येथील रहिवासी _मिराबाई गोकुळ कोळी_ यांच्या मेंदूच्या आजारावर शस्त्रक्रिया करावी लागणार होती यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी जळगाव येथील विविध रुग्णालयात खर्चाविषयी माहिती काढली असता मोठ्या प्रमाणावर खर्च लागणार होता अशा परिस्थितीत त्यांनी डॉ.कमलाकर पाटील(मा.सरपंच फुपणी) यांची भेट घेतली व सर्व माहिती कथन केली.डॉ.कमलाकर पाटील(मा.सरपंच फुपणी) यांनी मिराबाई यांच्या कुटुंबियांना धीर देत यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.तदनंतर डॉ.कमलाकर पाटील यांनी तात्काळ मा.ना.भाऊसो श्री.गुलाबरावजी पाटील

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री,महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव व बुलढाणा जिल्हा

यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली व मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीची विनंती केली. ना.भाऊंनी देखील मुख्यमंत्री सहायता निधीतुन सदर रुग्णास आपण मदत मिळवून देऊ असे डॉ.कमलाकर पाटील यांना आश्वासन दिले.यासाठी अर्ज करण्याच्या सूचना केल्या.डॉ.कमलाकर पाटील यांनी सर्व अर्ज योग्य कागदपत्रासहित केल्यामुळे सदर रुग्णास रु.100000 /- अक्षरी एक लाख रुपये एवढी रक्कम उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर झाली. ना.गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.कमलाकर पाटील यांचे रुग्णसेवेचे अविरत असे कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून मिराबाई गोकुळ कोळी यांच्यावरील उपचारासाठी आर्थिक मदत मिळाल्याने रुग्णाच्या कुटुंबीयांनी ना.गुलाबरावजी पाटील व डॉ.कमलाकर पाटील यांचे आभार मानले आहेत.तसेच मिराबाई यांच्या वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहकार्य मिळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने डॉ.कमलाकर पाटील यांनी देखील समाधान व्यक्त केले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh