कोळी समाजाच्या अन्नत्याग सत्याग्रहास जळगावच्या सामा. संस्थांचा जाहीर पाठिंबा

चोपडा –  तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे जातप्रमाणपत्र मिळावे, यासाठी महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगावलेकर) हे शेकडों कोळी समाज बांधवांसोबत दि. ८/५/२०२३, सोमवार रोजी स. ११ वाजेपासून अमळनेर येथील प्रांत कार्यालयासमोर तिव्र अन्नत्याग सत्याग्रह करणार आहेत. त्यांच्या ह्या कार्यास टोकरे कोळी, कोळी महादेव, मल्हार कोळी यांच्या उत्कर्षासाठी कार्यरत असलेली जळगाव येथील प्रवर्तन बहुउद्देशीय संस्था, आदिवासी वाल्मीकलव्य सेना तसेच आदिवासी टोकरे कोळी समाज परिषदेने जाहिर पाठिंबा दिला आहे.

यावेळी प्रवर्तन बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी मदन शिरसाटे, भिका सोनवणे, आर.एल.बाविस्कर, आदिवासी टोकरेकोळी समाज परिषदेचे मदन शिरसाटे, प्रदीप सोनवणे, विश्वासराव सोनवणे, आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे योगेश बाविस्कर चोपडा येथील ज्येष्ठ समाजसेवक लखिचंद बाविस्कर, डॉ. अशोक बाविस्कर, सामा. कार्यकर्ते वैभवराज बाविस्कर, अनिल कोळी यांची उपस्थिती होती.