भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील आरोग्य उपकेंद्रात जागतिक मलेरिया दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आरोग्य सेवक संजय कोळी यांनी मलेरिया सारख्या आजारावर मात करण्यासाठी काय प्रयत्न करावेत तसेच डास निर्मूलन करण्यासाठी गप्पी मासे सोडण्यात आली.अंगणवाडी केंद्रात माहिती देण्यात आली.कंटेनर ची पाहणी आरोग्य सेवक व आशा सेविका यांनी केली . सर्व मिळून मलेरिया सारख्या आजारावर मात करण्यासाठी प्रयत्न करू असे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले.यावेळी आरोग्य सेवक संजय कोळी यांनी विशेष माहिती दिली यावेळी सुनसगाव उपकेंद्राचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच आशा सेविका व अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.