जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचे वर्चस्व !

जळगाव ( प्रतीनीधी )जिल्ह्यातील भुसावळ, रावेर तर पारोळा बाजार समितीचा निकाल काल लागलेला आहे तर आज उरलेल्या सहा बाजार समित्यांसाठी रविवारी आज सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. जळगाव कृउबा समितीसाठी शहरातील थोर सन्मित्र कार्यालय येथे मतमोजणीस प्रारंभ झालेला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दहा जागा मिळवून भाजपा शिंदे गट युतिचा दणदणीत पराभव केला आहे.  ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून दोन जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात होते. यात दहा फेऱ्या होऊन युतीचे मिलींद दत्तात्रय चौधरी 268 मते व अपक्ष पल्लवी देशमुख 364 मते मिळवून विजयी झाले. सर्व साधारण गटातून लक्ष्मण गंगाराम पाटील, सुरेश पाटील, मनोज चौधरी, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, योगराज सपकाळे, प्रभाकर सोनवणे, शामकांत सोनवणे हे विजयी झाले असून आतापर्यत अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही.

jalgaonsandesh

jalgaonsandesh