अर्शदीप सिंगने २ स्टम्प तोडले, माहित आहे का ते किती लाखांचे होते? आकडा ऐकून येईल चक्कर

IPL – अर्शदीप सिंगने 20व्या षटकात अचूक यॉर्कर टाकून MIच्या दोन फलंदाजांचा त्रिफळा उडवला अन् मधला स्टम्प तोडला. पण, हे स्टम्प तुटणे आयोजकांना किती खर्चीक पडले ते माहित्येय का?

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातला वानखेडे स्टेडियमवरील सामना जबरदस्त चुरशीचा झाला. अर्शदीप सिंगने ( Arshdeep Singh) अखेरच्या षटकात मॅच फिरवली अन् दोन स्टम्प उडवून पंजाब किंग्सला १३ धावांनी विजय मिळवून दिला.

सॅम करन ( ५५) व हरप्रीत भाटीया ( ४१) या दोघांनी ९२ धावांची भागीदारी केली. पंजाबने अखेरच्या ६ षटकांत १०६ धावा कुटल्या. मॅथ्यू शॉर्ट ( ११), प्रभसिमरन सिंग ( २५) व अथर्व तायडे( २९) हे माघारी परतले होते. पंजाबने ८ बाद २१४ धावांचा डोंगर उभा केला.

कॅमेरून ग्रीन आणि रोहित शर्मा ( ४४) यांनी ७६ धावा जोडल्या. सूर्यकुमार यादवने ग्रीनसह ३६ चेंडूंत ७५ धावांची भागीदारी केली. ग्रीनने ४३ चेंडूंत ६७ धावा चोपल्या. सूर्यकुमारने २६ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५७ धावा केल्या. टीम डेव्हिड १३ चेंडूंत २५ धावांवर खेळत होता.

६ चेंडूंत १६ धावा असा असताना डेव्हिडने एक धाव घेत तिलक वर्माला स्ट्राईक दिली. अर्शदीपने तिसऱ्या चेंडूवर तिलकचा त्रिफळा उडवताना मधल्या स्टम्प्सचे दोन तुकडे केले. पुढच्याच चेंडूवर भन्नाट यॉर्कर टाकून अर्शदीपने नेहाल वधेराच्या स्टम्पचे दोन तुकडे केले.

मुंबईला ६ बाद २०१ धावा करता आल्या अन् पंजाबने १३ धावांनी सामना जिंकला. अर्शदीपने ४-०२९-४ अशी जबरदस्त गोलंदाजी केली. अर्शदीपने उडवलेल्या मधल्या स्टम्पमध्ये कॅमेरा असतो. झिंग बेल्ससह LED स्टम्पसच्या एका सेटची किंमत ३० लाख इतकी असते. त्यात अर्शदीपने दोनवेळा स्टम्प तोडला म्हणजे ही आयपीएलमधील आर्थिकदृष्ट्या महागडी ओव्हर म्हणावी लागेल.