PM मोदींची नक्कल करणं पडलं महागात; या कलाकारावर होणार कारवाई कारण…

प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकमधील बंदीपूर नॅसनल पार्कला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी केलेला लूक चांगलाच गाजला होता.

पंतप्रधान मोदींच्या या लूकची मिमिक्री करुन प्रसिद्ध होणारा श्याम रंगीला आता अडचणीत सापडला आहे.

राजस्थानच्या वन विभागाने त्याला नोटीस जारी केली आहे. आता वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अॅक्टचे उल्लंघन करणासाठी त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. अलिकडेच श्याम रंगीलाने जयपूरच्या झालाना जंगलात जाऊन नीलगायला खायला घातले होते आणि त्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. पंतप्रधान मोदींच्या मिमिक्रीमुळे श्याम रंगीला प्रसिद्ध झाला आहे.

जयपुर क्षेत्रीय वन अधिकारी जनेश्वर चौधरी यांनी म्हटले आहे की, युट्युब चॅनेल श्यामरंगीला वर 13 एप्रिलला झालाना लेपर्ड रिझर्वचा व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये श्याम आपल्या गाडीतून उतरुन आपल्या हाताने जंगली प्राणी नीलगायला खाद्यपदार्थ खायला देताना दिसत आहे. हे त्याचे कृत्य जंगली प्राण्यांना खाद्य पदार्थ खायला देणे हे वन अधिनियम 1953 आणि वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 या नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

जंगलातल्या प्राण्यांना खाद्यपदार्थ खायला घालल्यानंतर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. काही गंभीर आजारांचा सामना त्यांना करावा लागतो. जंगली जनावरांना खाद्यपदार्थ खाऊ घालू नये याचे जंगलात ठिकठिकाणी बोर्ड लावले आहेत. मात्र तरीही श्याम रंगीलाने नीलगायला खाद्यपदार्थ खाऊ घातले असेदेखील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

PM नरेंद्र मोदींसारखा लूक

श्याम रंगीलाने झालना लेपर्ड रिझर्व मध्ये जाताना पंतप्रधान मोदींसारखा लूक केला होता. त्यामुळे त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.

प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकमधील बंदीपूर नॅसनल पार्कला भेट देताना केलेल्या युनिक पोशाखामुळे बरीच चर्चा रंगली होती. त्यांची मिमिक्री कलाकार असेलेल्या श्याम रंगीलाने केली होती. मात्र नीलगायला खाद्यपदार्थ दिल्याच्या काही फोटो आणि व्हिडिओमुळे श्याम रंगीला वादात अडकला असून अडचणीत सापडला आहे.