काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बंडाळीमुळे भाजपा व बी आर एस ला फायदा

तालुका प्रतिनिधि भोकर – दत्ता बोईनवाड

भोकर – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अटीतटीची होणार अशी भोकर येथील सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा ऐकुयास मिळत आहे ही कृषी उत्पन्न बाजार समितीची बाजारपेठ नांदेड जिल्ह्यात मोठी बाजार समिती असल्याने मोठ्या प्रमाणात आवक जावक होत असते गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो याच भोकर मतदारसंघातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर तब्बल दहा वर्षापासून काँग्रेस पक्षाची सत्ता होती ही बाजार समिती या नात्या करणारे अनेक वेळ चर्चेमध्ये आली आहे एकलशाही घराण्याची सत्ता बाजार समितीवर असल्याने काँग्रेस पक्षातील अनेक निष्ठावंत कार्यकर्ते या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर कमालीचे नाराज असल्याने अंतर्गत पक्षातील नाराजी मुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार व त्याचा फायदा भारतीय जनता पार्टी व नव्यानेच महाराष्ट्रात तेलंगणातील टी आर एस चे मुख्यमंत्री के सी आर यांचा बी आर एस पक्षाने मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यात प्रवेश केल्याने भोकर येथील बहुजन नेतृत्व करत असलेले माजी सभापती नागनाथरावजी घिसेवाड काँग्रेसला रामराव ठोकून बी आर एस पक्षाचा झेंडा हाती घेतला. व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 पैकी 18 जागेवर आपले उमेदवार उभे केल्याने नागनाथरावजी घीसेवाडच्या जादुई खेड्यापाड्यासह भोकर तालुक्यातील अनेक जनतेची नाळ जोडली असल्याने त्यांनी या कृषी उत्पन्न बाजार समितीवर बी आर एस चा झेंडा फडकतील काय अशी खमंग चर्चा भोकरवासीयांमध्ये ऐकवयास येत आहे बी आर एस पक्षाचा बोलबाला ऐकता काँग्रेस पक्षाला याचा फटका बसतो की काय अशी शंका व्यक्त केल्या जात आहे, याचा फायदा मात्र भारतीय जनता पार्टी बाजी मारेल असाही सूर निघत आहे.

एकूण काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत नाराजीचा फायदा नक्कीच बी आर एस व भाजपाला मिळेल यात तीळ मात्र शंका नाही असे काही सुज्ञ कार्यकर्त्यांमधून चर्चा ऐकवयास येत आहे.

ताजा खबरें