मापाडी मतदार संघातून सय्यद खालेद यांचे नामनिर्देशन पत्र दाखल

तालुका प्रतिनिधि भोकर : दत्ता बोईनवाड

भोकर – कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकित हमाल मापाडी मतदार संघातून भोकर शहरातील सय्यद खालेद यांनी दि.०३ एप्रिल रोजी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

सय्यद खालेद यांनी अनेक वर्षापासून हमालांचे प्रश्न सोडविण्यासाठी पूढाकार घेतात काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे अत्यंत शिस्तप्रिय असलेले सय्यद खालेद यांनी मापाडी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काँग्रेसने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याचे सांगीतले संयमी व शांत तसेच जनसंपर्क त्यांचा मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या कार्यकूशलतेमूळे सर्वाना परिचित आहेत अनेकांच्या मदतीला ते धावून जातात म्हणून शहरातील सर्व हमाल मापाडी त्यांच्या पाठिशी आहेत पक्षाने जर उमेदवारी दिली तर निवडणूक लढवू अन्यथा काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठेने कार्य करु असे मनोगत स.खालेद यांनी व्यक्त केले आहे.

ताजा खबरें