‘जवान’ मधील शाहरूख खानचा लुक व्हायरल? या दिवशी रिलीज होतोय टीझर

मुंबई – बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेल्या शाहरुख खानच्या पठाण  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली.पठाण नंतर चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती किंगखानच्या जवान (Jawan) या आगामी सिनेमाची. साऊथचा लोकप्रिय दिग्दर्शक ॲटलीच्या जवान या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाबद्दल एक नवं अपडेट समोर आलंय. होय, चार दिवसांआधीच जवानचं शूटींग संपलं आहे. त्यामुळे येत्या २ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता वाढली आहे.

जवानबद्दल प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय. अद्याप हा सिनेमा रिलीज व्हायला बराच काळ आहे. पण आत्तापासूनच हॅशटॅग जवान ट्रेंड होतोय. चाहत्यांनी जवानचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्याचा सपाटा लावला आहे. काही दिवसांआधी सोशल मीडियावर एक अंडर वॉटर सीक्वेन्स लीक झाला होता. हा जवानचा अंडरवॉटर सीन असल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता. आता जवानचा एक लुकही व्हायरल होतोय.

यादिवशी येणार टीझर

बहुप्रतिक्षीत जवानचा टीझर कधीएकदा रिलीज होतो, असं चाहत्यांना झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, येत्या ईदच्या मुहूर्तावर जवानचा धमाकेदार टीझर रिलीज केला जाऊ शकतो. याचदिवशी सलमान खानचा किसी का भाई किसी की जानल हा सिनेमा रिलीज होतोय.जवानमध्ये शाहरूख डबल रोलमध्ये दिसणार असल्याचंही म्हटलं जात आहे. यात शाहरूख पुन्हा एकदा जबरदस्त ॲक्शन अवतारात दिसणार आहे.

या चित्रपटात ॲक्शन सीनची जबाबदारी सुनील रॉड्रिग्स आणि एएनएल अरासू यांच्या खांद्यावर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवानमध्ये लार्जर दॅन लाईफ आणि आकर्षक गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत.

या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. तर नयनतारा त्याच्याविरुद्ध भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय प्रियामणी, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर आणि योगी बाबू यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.