गोंभी येथील शेतकऱ्याचा कृषी विभागाकडून सन्मान !

भुसावळ – येथून जवळच असलेल्या गोंभी शिवारात गहू पिकाचे चांगले उत्पादन घेतल्याने गोंभी येथील शेतकरी तुकाराम आत्माराम पाटील यांच्या शेतातील गहू पिकाचे वजन करण्यात आले .

भुसावळ तालुक्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागात शेतकऱ्यांकडून प्रयोग करण्यात येतात व उत्पादकता वाढविण्यात येते अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पन्नात प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल वाढते आणि शेतकरी नवनवीन प्रयोग करतो.आणि शेतकरी उत्पादन वाढवतो. हा उद्देश समोर ठेवून भुसावळ तालुक्यात पिक स्पर्धा राबविण्यात आली होती त्यात गोंभी येथील तुकाराम आत्माराम पाटील यांच्या शेतातील गहू या पिकाचे कापणी व मळणी करून वजन घेतले त्यावेळी कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक अधिकारी डी एम चौधरी , कृषी सहायक सूरज काळे यांनी माहिती दिली.यावेळी शेतकरी तुकाराम पाटील , सरपंच दिपक सावकारे , सदस्य शामराव मालचे , शेतकरी सुधाकर पाटील , अविनाश पाटील , खुशाल पाटील ,रोहित पाटील तसेच एकनाथ सपकाळे व शेतकरी हजर होते

jalgaonsandesh

jalgaonsandesh