पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धानोरा येथील नुकसान ग्रस्तांना मदतीचा चेक वाटप 

जळगाव – धानोरा खुर्द येथे गेल्या काही दिवसांपूर्वी दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी नदी काठी असलेली मातीची कराड कोसळून भिल्ल तसेच कोळी बांधवांच्या उदरनिर्वाह करणाऱ्या बकऱ्या कराड खाली दाबल्या गेल्याने मरण पावल्या होत्या.पोट भरण्याचे साधन गेल्याने नागरिक चिंतीत होते.

गावातील बांधवांचे झालेले नुकसान पाहून तेथील लोकनियुक्त सरपंच श्री.देवेंद्र पाटील यांनी तलाठी व सरकारी अधिकारी सोबत घेऊन तातडीने नुकसान पंचनामा केला व त्यांना मदतीचा हात दिला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकारी यांना सक्त आदेश देऊन पंचनामा करावयास सांगितले. 20 बकऱ्या मेल्याचे पंचनाम्यात निष्पन्न झाले.पालकमंत्री यांनी सरासरी 4 हजार रु. प्रमाणे शासकीय मदत मिळऊन देत त्या परिवारांना मदत करून जणू जगण्याची नवीन आशा दिली.

श्यामलाल महारु भिल- 16000, शोभाबाई नाना भील – 12000 , आकाश ईश्वर कोळी – 32000 , निर्मलाबाई लकीचंद भील – 4000, आनंद रामलाल भील – 16000

अश्या स्वरूपात मदत मिळून दिली त्या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच करंज- धानोरा.खु श्री देवेंद्र रमेश पाटील, मा. जि.प.सदस्य. श्री पवन भिला कोळी, मा.सभापती पं.स. जनार्दन आप्पा कोळी,विदगाव ग्राप सदस्य लखीचंद कोळी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. त्याप्रसंगी गावातील नुकसानग्रस्त बांधवांनी लोकनियुक्त सरपंच देवेंद्र पाटील यांचे विशेष आभार प्रकट केले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh