राहूल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर महाराष्ट्रातून तिव्र प्रतिक्रिया; ही लोकशाहीची हत्या- उद्धव ठाकरे

राहूल गांधींच्या अटकेनंतर महाराष्ट्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासह अजित पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण या महाविकास आघाडीतील नेत्यांनी तिव्र नाराजी व्यक्त करून देशात लोकशाही धोक्यात असल्याचे म्हटले आहे.

राहूल गांधींच्या खासदारकी रद्द झाल्याची बातमी बाहेर येताच उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि, “या देशात चोराला चोर म्हणणे गुन्हा ठरला आहे. सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. आज राहुल गांधींची खासदारपद रद्द करण्यात आले असून हि लोकशाहीची हत्या आहे. देशात देश लुटणारे आणि चोर दोघेही मोकळे आहेत. याउलट देशातील लोकांना अटक केली जात आहे.” असे म्हटले आहे.

राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपववर जोरदार टीका केली. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले. “राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला असून हा निर्णय लोकशाही विरोधी आहे. गेल्या ९ वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या मित्रांनी लाखो- हजारो कोटी रुपये देशातून पळवले आहे. मात्र, त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द केले आहे. याचा महाराष्ट्र कॉंग्रेस निषेध करत असून मोदी सरकारचा धिक्कार करतो.” अशी संतप्त प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh