ममुराबाद येथे बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल.

 

ममुराबाद (प्रतिनिधी) शाळा सुरू असल्याने जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे एसटी महामंडळाची बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. तसेच चालक वाहक अर्वाच्य भाषेत बोलत असल्याने ग्रामस्थ व विद्यार्थी संतापले आहेत.

ममुराबाद येथून अनेक विद्यार्थी शाळा व महाविद्यालय शिक्षण घेण्यासाठी ये जा करीत असतात. मात्र गेल्या काही दिवसांनपूर्वी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या महिलांनसाठी बस प्रवासात पन्नास टक्के सुटच्या निर्णयामुळे बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे भासवुन ड्रायव्हर कंडक्टर बस थांबवत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत जाता येत नाही. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बस आल्यावर विद्यार्थी बस मागे पळतात. मात्र चालक लागलीच वेग वाढवून पळून जात असल्याने दोन दिवसांनपुर्वी ग्रामस्थांनी बस अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने सरळ अंगावर बस आणली त्यामुळे ग्रामस्थ अधिकच संतापले आहेत. काहींनी याबाबत एसटी कडे तक्रार केली असता तुमच्या ग्रामपंचायतीचे पत्र नाही. त्यामुळे बस थांबवली जात नाही असे विचित्र उत्तर दिल्याची ओरड विद्यार्थ्यांनी केली.

यावल, चोपड्याहून येणार्‍या एसटीमध्ये गर्दी असते म्हणून बस थांबवता येत नाही. दुसरी जादा फेरी सुरू करण्याचा विचार आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय लवकरच दूर केली जाईल.

जळगाव आगार व्यवस्थापक, मनोज तिवारी

jalgaonsandesh

jalgaonsandesh