जुन्या पेन्शनबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी विधानभवनात केलं मोठं भाष्य

मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. ‘जुन्या पेन्शनबाबत समिती नेमली आहे. ३ महिन्यात अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात दिली.

जुन्या पेन्शनबाबत आज विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं भाष्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात म्हटले की, ‘जुनी पेन्शन योजना लागू केल्यानंतर काय परिणाम होईल, याबाबत समिती नेमली आहे. जुन्या पेन्शनबाबतची बाब ही सर्व संघटनांनी लक्षात आणून दिली आहे. माझ्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे. दोन्ही विरोधी पक्षनेते उपस्थित होते’.

मुख्यमंत्री शिंदे  पुढे म्हणाले, ‘जुन्या पेन्शनबाबत  शासनाची भूमिका सहानुभूतीची आहे. जे काही सूत्र ठरेल त्यानुसार त्यांना देखील लाभ होईल. कर्मचाऱ्यांनी संपाबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे. लोकांची गैरसोय होते, त्यासाठी संप मागे घ्यायला हवा.

‘शासन म्हणून कारभार चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. शासन याबाबत सकारत्मक आहे. आर्थिक परिणाम काय होईल, याबाबत सूचना करण्यात आल्या. हे तपासण्याची आवश्यकता आहे. आपण चर्चेद्वारे प्रश्न सोडवू. संप मागे घ्यावा अशी विनंती करतो’,असेही शिंदे म्हणाले.काय आहेत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या?

नवीन पेन्शन योजना (NPS) रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना (OPS) पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा.

कंत्राटी व योजना कामगार प्रदिर्घकाळ सेवेत असल्यामुळे, सर्वांना समान किमान वेतन देऊन त्यांच्या सेवा नियमित करा.

सर्व रिक्त पदे तत्काळ भरा. (आरोग्य विभागास अग्रक्रम द्या) तसेच चतुर्थश्रेणी व वाहन चालक कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस केलेला मज्जाव तत्काळ हटवा.

अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाशर्त करा. तसेच कोरोना काळात मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वयाधिक झालेल्या पाल्यांना विहित वय मर्यादेत सूट द्या.

सर्व अनुषंगिक भत्ते केंद्रासमान मंजूर करा. (वाहतूक, शैक्षणिक व इतर भत्ते)

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे निरसित करु नका. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने मांडलेल्या इतर सर्व प्रलंबित मागण्या सत्वर मंजूर करा. ७.शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न तत्काळ सोडवा.

निवृत्तीचे वय ६० वर्षे करा.

नवीन शिक्षण धोरण रद्द करा.

नर्सेस / आरोग्य कर्मचा-यांच्या आर्थिक व सेवाविषयक समस्यांचे तत्काळ निराकरण करा.

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे सद्या रोखलेले पदोन्नती सत्र तत्काळ सुरु करण्यात यावे.

उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी देण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ववत सुरु करण्यात यावी. या संदर्भात मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करण्यात यावे.

वय वर्षे ८० ते १०० या वयातील निवृत्त कर्मचान्यांसाठी केंद्र शासनाने विहित केल्याप्रमाणे मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी.

कामगार-कर्मचारी-शिक्षकांच्या हक्कांचा संकोच करणारे कामगार कायद्यातील मालकधार्जिणे बदल रद्द करा.

आदिवासी नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजने व्यतिरिक्त एकस्तर वेतनवाढीचा लाभ कायम ठेवण्यात यावा व संबंधित कर्मचान्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात यावा.

शिक्षणसेवक, ग्रामसेवक आदिना मिळणान्या मानधनात वाढलेल्या महागाईचा विचार करुन वृद्धि करण्यात यावी.

शासकीय विभागात कोणत्याही स्वरुपाच्या खाजगीकरण/ कंत्राटीकरणास सक्त मज्जाव करण्यात यावा.

पाचव्या वेतन आयोगापासूनच्या वेतन त्रुटींचे निराकरण करण्यास बक्षी समितीला अपयश आले आहे. त्यामुळे याबाबत सखोल पुनर्विचार करुन सर्व संबंधित प्रवर्ग कर्मचारी-शिक्षकांना न्याय देण्यात यावा.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा