बौद्ध साहित्य संस्थेच्या जीवन गौरव पुरस्कारार्थ जयसिंग वाघ यांची निवड

जळगाव :– बौद्ध साहित्य संस्था संचालित बौद्ध साहित्य परिषद महाराष्ट्र तर्फे २ व ३ एप्रिल रोजी ३ रे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन जळगाव येथे घेण्यात येत आहे , यात महाराष्ट्रातील दहा साहित्तिकाना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे , त्यात जळगाव येथील प्रसिद्ध साहित्तीक जयसिंग वाघ यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे केंद्रीय सचिव तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा भरत शिरसाठ यांनी दिली

जयसिंग वाघ यांच्या निवडीचे पत्र प्रा भरत शिरसाठ , बौद्ध साहित्य परिषदचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी वाघ यांस प्रत्यक्ष भेटून सन्मानपूर्वक दिले , या प्रसंगी केशवसुत पुरस्कार प्राप्त प्रख्यात कवी शशिकांत हिंगोनेकर , डॉ अशोक सैंदाने , विवेक सैंदाने , नथु अहिरे , महेंद्र केदार , सुनंदा वाघ , स्वप्निल वाघ , मयूर वाघ , स्वाति वाघ आदि मान्यवर हजर होते

या प्रसंगी संस्थेच्या पदाधिकारी यांनी जयसिंग वाघ व सुनंदा वाघ यांचा शाल , बुके देऊन सत्कार केला .वाघ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले