झुरखेडा ग्रामपंचायतमध्ये तत्कालीन ग्रामसेवकांचा मोठा भ्रष्टाचार  पण या सर्व बाबीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मात्र दुर्लक्ष

धरणगाव – तालुक्यातील झुरखेडा येथील ग्रामपंचायतमधील कथित भ्रष्टाचार संबंधी सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार (पाटील) यांनी दि.२०/०९/२०२१ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांचेकडे तक्रार केली होती त्या तक्रारीमध्ये  संबंधित तक्रारदार यांनी चौकशी पंचायत समिती धरणगाव यांचे कडून न करता जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्याच्या पंचायत समिती यांचेकडून करण्यात यावी अशी मागणी केली होती त्याअनुषंगाने दि.२१ऑक्टोबर २०२१ रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती चोपडा यांना चौकशी आदेश देण्यात आले त्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी निशा जाधव यांनी ग्रामपंचायत झुरखेडा येथे प्रत्यक्ष जाऊन चौकशी अहवाल दि.२५ जाने.२०२३ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांचे कडे पाठविला त्या अहवालानुसार सर्व ग्रामसेवक यांच्यावर कार्यवाहिसत्व दि. ०२ फेब्रुवारी २०२३ रोजी उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती धरणगाव यांना आदेश पाठविले त्या अनुषंगाने सुशांत पाटील गटविकास अधिकारी धरणगाव यांनी दि.२० मार्च २०२३ रोजी त्यातील दोषी ग्रामसेवक व्ही. सी. पाटील तत्कालीन ग्रामसेवक ग्रामपंचायत झुरखेडा ता.धरणगाव हल्ली पंचायत समिती यावल, डी. एस. इंगळे तत्कालीन ग्रामसेवक ग्रामपंचायत झुरखेडा ता.धरणगांव हल्ली पंचायत समिती बोदवड, एस. एल. पाटील तत्कालीन ग्रामसेवक, ग्रामपंचायत झुरखेडा ता.धरणगांव हल्ली ग्रामपंचायत पथराड खु. व तरडे ता.धरणगाव, एम. एल. सोनवणे ग्रामसेवक ग्रामपंचायत झुरखेडा ता.धरणगाव हल्ली ग्रामपंचायत बाभुळगाव व भामर्डी ता.धरणगाव यांना १. स. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा) जिल्हा परिषद जळगांव यांचेकडील पत्र क्र. ग्राम-१/आरआर/२५३/२०२३ दि.०२/०२/२०२३ सुरेश आप्पा गो. पवार (पाटील) झुरखेडा ता धरणगांव यांचा अर्ज दि.२०/०९/२०२१

सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती चोपडा यांचा अहवाल दि.०६/०१/२०२३ व २५/०१/२०२३ उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, श्री. सुरेश आप्पा गो.पवार (पाटील) रा. झुरखेडा ता धरणगांव यांनी मौजे झुरखेडा ता धरणगांव येथील शासनाकडुन आलेले निधीचा खर्च व सर्व कामाच्या सखोल चौकशीबाबतचा अहवाल सादर करणेबाबत दिलेल्या तक्रारी अर्जानुसार सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती चोपडा यांनी  म.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांचेकडे सादर केलेला असुन  महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग, शासन परिपत्रक क्र. व्हीपीएम-२०१६/प्र.क्र.२५३/परा-३ दि.०४/०१/२०१७ व क्रं. व्हीपीएम-२०१२/प्र.क्र.२८१/परा-३ दि. १८/०९/२०१९ च्या परिपत्रकानुसार कार्यवाही करुन व संबंधिताकडुन वसुलपात्र रक्कमा वसुल करणेबाबत अहवाल पंचायत समिती धरणगाव यांच्या कार्यालयास प्राप्त झालेला आहे सदर अहवालाप्रमाणे तत्कालीन ग्रामसेवक यांच्या कार्यकाळातील त्रुटींची पुर्तता कागदपत्राच्या पुराव्यासह करुन ७ दिवसाच्या आत समक्ष सादर करावा. असे पत्राद्वारे ग्रामसेवक यांना कळविले आहे तसेच त्यांनी मुदतीत त्रुटीची पुर्तता व खुलासा सादर न केल्यास वरील प्रमाणे प्रशासकीय कार्यवाही केली जाईल यांची गार्भीयाने नोंद घ्यावी. असे गटविकास अधिकारी धरणगाव यांनी लेखी पत्राद्वारे सर्व ग्रामसेवक यांना कळविले आहे त्यानुसार सर्व ग्रामसेवक यांनी आज रोजीपर्यंत कोणतेही उत्तर सादर केलेले नाही त्यामुळे आता गटविकास अधिकारी धरणगाव या सर्व ग्रामसेवकांवर काय कार्यवाही करतात याकडे सर्व गावकरी लक्ष ठेऊन आहेत.

jalgaonsandesh

jalgaonsandesh