रणबीर-श्रद्धाचा ‘तू झुठी में मक्कर’ चा बॉक्स ऑफिसवर जलवा; कमावला इतक्या कोटींचा गल्ला.

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी ‘तू झुठी में मक्कर’ चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना खूप प्रभावित केले आहे. होळीच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार ओपनिंग केली.

या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘पठाण’ नंतर या वर्षातील बॉलीवूड चित्रपटाची दुसरी सर्वोत्तम ओपनिंग नोंदवली. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याच्या संकलनात घट दिसून आली. आता वीकेंड आल्याने चित्रपटाने गती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. लव रंजन दिग्दर्शित हा रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपट आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शननुसार, “तू झूठा मैं मक्कर’ तिसर्‍या दिवशीही चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत जवळपास 31.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. दरम्यान, चित्रपटाच्या पहिल्या शनिवारच्या कलेक्शनचे आकडेही समोर आले आहेत. सुमारे 100 कोटींच्या बजेटमध्ये ‘तू झूठा मैं मक्कर’ हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.73 कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्या दिवसाच्या कमाईत काहीशी घट झाली. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 9.34 कोटींचीकमाई केली. तिसऱ्या दिवशी 10.50 कमावले. आता चौथ्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले आहे. चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत जबरदस्त झेप घेतली आहे. शनिवारी या चित्रपटाने 16 कोटींचा व्यवसाय केला. बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइड चित्रपटानुसार एकूण कलेक्शन 52.59 कोटींवर गेले आहे.

हा चित्रपट एक कॉमेडी, रोमान्स आणि फॅमिली ड्रामा चित्रपट आहे ज्यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर आहेत. हा चित्रपट मिकी आणि टिनीची प्रेमकथा आहे जे त्यांच्या बेस्ट फ्रेंडच्या बॅचलर पार्टीत भेटतात. आणि पुढे त्यांची लव स्टोरी सुरु होती. हा चित्रपट दोघांच्या प्रेमकाहाणी भोवती फिरतो.

jalgaonsandesh

jalgaonsandesh