गोंभी येथे श्री भैरवनाथ महाराज यात्रा व बारागाड्या !भगत विजय चिंचाळे ( कोळी ) हे ओढणार बारा गाड्या.

सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – येथून जवळच असलेल्या गोंभी येथे सालाबादप्रमाणे यंदाही सोमवार दि.१३ मार्च रोजी श्री भैरवनाथ महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आले असून यात्रे निमित्त संध्याकाळी भगत विजय पंडित चिंचाळे ( कोळी ) हे बारा गाड्या ओढणार आहे.

दोन तीन वर्षांपासून कोरोना काळात यात्रेचे आयोजन करण्यात आले नसल्याने यंदा ग्रामस्थांना यात्रेचा आनंद घेता येणार आहे.यात्रेत खेळणी , मिठाई , पाळणे ,अशी दुकाने असतात तर रात्री ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी सोमनाथ भाऊ रतनभाऊ नगरदेवळेकर यांच्या लोकनाट्य तमाशा चे आयोजन करण्यात आले आहे.यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी गावातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून परिसरातील नागरिकांनी या यात्रेचा आनंद घ्यावा असे आवाहन गोंभी ग्रामस्थांनी केले आहे.

यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस पाटील व सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी शांततेचे आवाहन केले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh