आता 80 वर्षांवरील मतदारांना घरातूनच करता येणार मतदान

राज्य सरकारचा कार्यकाळ 24 मे 2023 रोजी संपणार आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभेसाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. तर मेच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यात प्रथमच विधानसभा निवडणुकीवेळी 80 वर्षांवरील मतदारांना घरातूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

राज्य सरकारचा कार्यकाळ 24 मे 2023 रोजी संपणार आहे. तत्पूर्वी पारदर्शक आणि निर्भिडपणे निवडणूक घेण्यासाठी सज्ज राहण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. 80 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या आणि दिव्यांगांना घरातूनच मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळणार आहे. मतदान केंद्रातही त्यांना विशेष व्यवस्था केली जाणार आहे. तरी सुद्धा मतदान केंद्रापर्यंत येऊन मतदान करणे शक्य न होणाऱ्यांना घरातूनच मतदान करण्यासाठी सुविधा दिली जाणार आहे. सर्वांना मतदानाचा मतदानाच हक्क बजावता यावा, याकरिता हे पाऊल उचलण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

गुरुवारी राज्य दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने तीन दिवस विविध स्तरावर बैठका घेतल्या. मतदार जागृतीसंबंधी कार्यक्रमाचे आयोजनही केले होते. शनिवारी नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी राजीव कुमार म्हणाले, तत्पूर्वी विधानसभेची निवडणूक घेण्यासाठी कर्नाटकात कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांविषयी विस्तृत चर्चा करून माहिती घेतली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या असून निवडणूक प्रक्रियेच्या तयारीची माहिती जाणून घेतली आहे. त्याचप्रमाणे आवश्यक सूचना आणि सल्ले देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

राज्यात 31 महसूल जिल्हे असून 34 निवडणूक जिल्हे म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे. 2011 च्या जनगणनेनुसार कर्नाटकाची लोकसंख्या 6.1 कोटी इतकी आहे 224 विधानसभा मतदारसंघांपैकी अनुसूचित जातींसाठी 36 आणि अनुसूचित जमातींसाठी 15 मतदारसंघ राखीव आहेत.

राज्यात 5,21,76,579 मतदार

राज्यात 3 मार्च 2023 पर्यंत एकूण 5,21,76,579 मतदार आहेत. त्यामध्ये 2,62,42,561 महिला आणि 2,59,26,319 पुरुष मतदार आहेत. 80 वर्षांहून अधिक वयाचे 12,15,763 आणि शंभरी पार केलेले 16,976 मतदार आहेत. यावेळी 9,17241 नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. राज्यात सुमारे 42,756 तृतीयपंथी आहेत. त्यापैकी 41,312 जण मतदार आहेत, अशी माहितीही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

9.17 लाख जण प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क

निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांमुळे यावेळी 9.17 लाख नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शिवाय अॅडव्हान्स अॅप्लिकेशन सुविधेद्वारे अलीकडेच 1.25 लाख युवक-युवतींनी अर्ज सादर केले असून त्यापैकी 41 हजार मतदार 1 एप्रिल 2023 पासून मतदान करण्यासाठी पात्र ठरणार आहेत. मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी अनेक जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहेत.

राज्यात एकूण 58,282 मतदान केंद्रे

राज्यात प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 883 मतदार या प्रमाणे एकूण 58,282 मतदान केंद्रे स्थापन केली जातील. शहरी भागात 24,063 आणि ग्रामीण भागात 34,219 मतदान केंद्रे असतील. विशेष करून महिलांसाठी 1320 महिला मतदान केंद्रे, 224 दिव्यांग मतदार केंद्रे आणि 240 आदर्श मतदार केंद्रे स्थापन करण्यात येतील. तसेच 1200 मतदान केंद्रे संवेदनशील केंद्रे असणार आहेत. राज्यातील 50 टक्के मतदान केंद्रे वेबकास्टिंग सुविधांनी युक्त असतील, अशी माहितीही मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली.

दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रात विशेष सुविधा उपलब्ध केल्या जातील. घरापासून मतदान केंद्रापर्यंत पिक अॅण्ड ड्रॉप सुविधा केली जाईल. त्याकरिता अॅपवर नोंदणी करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मतदान केंद्रावर व्हिलचेअर, प्रीयॉरिटी व्होटींग मशीन, दृष्टीहीन मतदारांना ब्रेल बॅलेट पेपरसारख्या अनेक सुविधा उपलब्ध केल्या जातील, असेही ते म्हणाले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला