भुसावळ वीज केंद्र येथे 53 वा राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह साजरा करण्यात आला.

भुसावळ –  कार्यक्रमाची सुरुवात 500 मेगा व्हाट च्या फॅक्टरी गेट वरील सेफ्टी मॅन कट आऊटचे अनावरण मा. श्री. मोहनजी आव्हाड साहेब मुख्य अभियंता आणि डॉ. श्री रविंद्र गोहणे साहेब मा. मुख्य अभियंता यांचे शुभ हस्ते करण्यात आले. या केंद्रात येणारे अधिकारी कर्मचारी कंत्राटी कामगार तसेच अभ्यंगत या सेफ्टी मॅन पासून प्रेरणा घेऊन नेहमी सतर्क आणि सजग राहून आपल्या स्वतः ची, महानिर्मितीची आणि समाजाची काळजी अपघात विरहित कार्य करतील अशी अपेक्षा मा. श्री. मोहनजी आव्हाड साहेब मुख्य अभियंता यांनी व्यक्त केली. या नंतर वसाहतीमधील नवीन क्लब येथे भरगच्च कार्यक्रमात सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी संघटना प्रतिनिधी आणि कंत्राटी कामगार यांना सुरक्षिततेची शपथ देण्यात आली.

सर्व मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर प्रमुख अतिथी तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉ श्री रवींद्र गोहणे साहेब माजी मुख्य अभियंता महानिर्मिती यांनी उपस्थितांना पीपीटी च्या माध्यमातून सुरक्षा विषयक सखोल मार्गदर्शन केले.अपघात कसे घडतात,अपघातांवर नियंत्रण कसे मिळवावे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

यानंतर कार्यक्रमामध्ये श्री नितीन देवरे लिखित दिग्दर्शित पथनाट्य आधार याचे सादरीकरण करण्यात आले.वीज केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या 13 अधिकारी आणि कलाकारांनी खूप छान सादरीकरण केले.आपल्या जीवनामध्ये असलेले सुरक्षिततेचे महत्व त्यांनी या पथनाट्याद्वारे उपस्थितांना दिले.

यानंतर वीज केंद्रातील श्री पवन सोनुने यांची एम पी एस सी च्या मार्फत महाराष्ट्र शासन ऊर्जा विभागात सहा. संचालक म्हणून निवड झाल्याबाबत गौरव करण्यात आला. तसेच सुरक्षितता सप्ताहाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा जसे निबंध स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा सेफ्टी पोस्टर स्पर्धा या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विजेत्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले.

मागील वर्षात सुरक्षितता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करून अपघात टाळण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सुरक्षितता दूत हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यानंतर विज केंद्रामध्ये दिलेल्यासी पी आर या ट्रेनिंगचा सुयोग्य वापर करून केंद्रातील दवाखान्यात औषध निर्माता म्हणून कार्यरत श्री विशाल कसादे यांनी रेल्वे प्रवासात आपले सहप्रवासी जेष्ठ नागरिक यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्यावर त्वरित प्रथमोपचार म्हणून त्यांना सीपीआर दिल्या मुळे वेळीच त्या ज्येष्ठ नागरिकास मदत मिळून त्यांचे प्राण वाचले तसेच नवीन क्लब येथे कार्यरत असलेले श्री प्रवीण बोदडे यांनी देखील सतर्क राहून आपल्यासोबत काम करीत असलेल्या व्यक्तीस छातीत दुखत असताना ताबडतोब दवाखान्यात नेऊन त्याचे प्राण वाचवले यासाठी या दोघांना सुरक्षितता जीवनदूत हा पुरस्कार देण्यात आला.

वसाहतीमध्ये आणि कारखान्यांमध्ये नेहमी सर्प निघून कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते यासाठी सर्पमित्र म्हणून काही कर्मचारी धावून येतात व त्यावेळी तत्परतेने मदत करून सर्प पकडून त्यांना निसर्गाच्या सानिध्यातमुक्त सोडतात अशा सर्पमित्रांना सर्पमित्र हा पुरस्कार आणि सर्प पकडण्याचे साहित्य देऊन गौरव करण्यात आला.

आपल्या अध्यक्षीय भाषणातमा श्री मोहन आव्हाड साहेब यांनी सुरक्षिततेचे महत्व सांगून ज्याप्रमाणे आपण सकाळी हसमुखाने कुटुंबीयांना बायबाय करीत कामावर येतो,त्याचप्रमाणे कामावर असताना सुरक्षित कार्य करून असेच हस मुखानेच आपापल्या घरी जावे,कारण आपल्या घरी आपले आपली वाट बघत असतात असे भावनिक आवाहन त्यांनी सर्वांना केले कार्यक्रमाचे सुंदर प्रास्ताविक श्री पवन सोनुने अति सुरक्षितता अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरक्षितता अधिकारी श्री मोहन सरदार यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरक्षितता विभागातील श्री छगन पवार,श्री शैलेश नारखेडे,श्री प्रीतीलाल राठोड,सौ मोहिनी फेगडे, श्री प्रफुल्ल निकम श्री किशोर पाटील आणि श्री वैभव झोपे यांनी मेहनत घेतली कार्यक्रमास सर्व उपमुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता,सर्व विभाग प्रमुख,संघटना प्रतिनिधी आणि कंत्राटी कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.