प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – वर्गमित्र म्हटले की सर्व आठवणी उफाळून येतात मग ती भेट केव्हाही असो एकमेकांना भेटून आनंदच वाटतो असाच सुखकारक अनुभव प्रकाश हायस्कूल सुनसगाव येथील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला विशेष म्हणजे ऐन सत्तरीच्या वयात चक्क एक्का वन वर्षांनी हे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र आले.
सुनसगाव येथील प्रकाश हायस्कूल चे १९७३ साली इयत्ता दहावीच्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गेट टुगेदर करण्याचा निर्णय घेतला याची खरी सुरुवात केली ती येथील मुळ रहिवासी व सध्या कॅनडा येथे स्थायिक झालेले बाळासाहेब काशिराम पाटील यांनी त्यांनी आपल्या गावाकडील वर्गमित्रांना सांगितले की सर्वांचे फोन नंबर गोळा करून एक गृप तयार करून एक दिवस जळगाव येथे जमून एकमेकांना भेटून आनंद व दुःख वाटून घेऊ! त्यानुसार मुंबई, नाशिक, पुणे व जळगाव तसेच बेलव्हाळ, जळगाव खुर्द, बेलव्हाळ येथील सर्व वर्गमित्र जळगाव येथे गोळा झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश हायस्कूल चे व्हा चेअरमन हरी पांडू पाटील तर प्रमुख पाहुणे डी आर पाटील, पत्रकार जितेंद्र काटे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सर्व वर्ग मित्र व मैत्रीणी यांनी आपल्या आनंदाचा आणि दुःखाचा अनुभव कथन केला तसेच आपल्या मित्रांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी ताराबाई आमोदकर, रामदास चौधरी, सुभाष पाटील, यांनी आपले विचार मांडले.
या कार्यक्रमात अनेक जण सत्तरीच्या जवळपास होते त्यामुळे कोणाला चालता येत नव्हते तर काही अनेक आजारांनी त्रस्त झाले होते मात्र ५१ वर्षांपूर्वी आपण कसे दिसत होतो आणि आता आपले मित्र कसे दिसत आहेत या उत्सुकतेने सर्व मित्र परिवार गोळा झालेला होता. यावेळी स्नेह भोजन करण्यात आले.