रावेर शहरांमध्ये एका 36वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मुंजलवाडी प्रतिनिधी:- चंद्रकांत वैदकर

रावेर – :शहरांमध्ये एका तरुण युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्घटना आज संध्याकाळी रावेर मध्ये घडली रावेर शहरातील रसलपुर आणि मुंजलवाडी रस्त्यावरील नागझिरी परिसरातील गजू रविंद्र परदेशी वय 36 वर्ष या तरुणाने आज संध्याकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली त्यास ताबडतोब खाली उतरवले आणि रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषित केले

असे अचानक झाल्यामुळे रावेर शहरात हळहळ व्यक्त केले जात आहे