बालासोर रेल्वे अपघात प्रकरणी 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघात प्रकरणी तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या भीषण दुर्घटनेत 292 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील तिन्ही आरोपींवर भारतीय दंड विधानाच्या कलम 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तीन कर्मचाऱ्यांमध्ये अरुण कुमार महंत (कनिष्ठ अभियंता), मोहम्मद आमीर खान (कनिष्ठ विभागीय अभियंता) आणि पापु कुमार (तंत्रज्ञ) यांचा समावेश आहे. कलम 304 अंतर्गत (निर्हेतुक हत्या) हा गुन्हा सिद्ध झाल्यास जन्मठेप आणि दंड किंवा सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसंच, कलम 304 सोबत त्यांच्यावर कलम 201 अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओडिशातील बालासोर जिह्यात बाहानगर बाजार स्टेशनवर हा अपघात घडला. शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेस मालगाडीला धडकली आणि डबे घसरले. त्याचवेळी येणारी बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्प्रेसची कोरोमंडल एक्प्रेसच्या डब्यांना धडकली. यामुळे बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्प्रेसचेही डबे घसरले आणि एकच गोंधळ उडाला. दोन्ही एक्प्रेसचे डबे घसरल्याचे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. हा अपघात एवढा भीषण होता की, रेल्वे डबे तुटले, रूळ उखडले. शेकडो प्रवासी डब्यांमध्ये अडकले होते. कटरच्या सहाय्याने डबे तोडावे लागले. या दुर्घटनेत 292 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एक हजारांवर प्रवासी जखमी झाले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh