कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना बळीराजा शेतकरी विकास पॅनलच्या वतीने 27 उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले.

तालुका प्रतिनिधि भोकर : दत्ता बोईनवाड

भोकर– भाजप जिल्हाध्यक्ष श्री. व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भाजप जिल्हाउपाध्यक्ष श्री. राजा खंडेराव देशमुख, भाजप जिल्हाउपाध्यक्ष श्री. दिलीपराव सोनटक्के, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. किशोरभाऊ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
याप्रसंगी माजी जिल्हापरिषद सदस्य दिवाकर रेड्डी सुरकुंटवाड, माजी प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री. प्रकाश मामा कोंडलवार,ओबीसी सेलचे जिल्हाउपाध्यक्ष श्री. गणपतराव पिटेवाड, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष श्री.गणेशराव पाटील कापसे, भाजप तालुकाअध्यक्ष श्री. किशोर पाटील लगळुदकर,शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल पाटील पवार,ओबीसी सेल जिल्हा चिटणीस हरिभाऊ चटलावार, भाजप शहराध्यक्ष श्री. विशाल माने, शिवसेना शहरप्रमुख अजय टाक,भाजप युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष श्री. बालाजी येलपे डौरकर, युवा मोर्चा तालुकाअध्यक्ष श्रीकांत पाटील किन्हाळकर,युवा मोर्चा जिल्हा कार्यकारणी सदस्य तेजस मेलदोडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष वेनू पा. कोंडलवार, भाजप तालुका सरचिटणीस चंद्रकांत नागमोड, युवा मोर्चा तालुकाउपाध्यक्ष संदीप पाटील कोळगावकर,युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष शिवानंद पाटील बोरगावकर, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस प्रल्हाद मांजरे, युवासेना तालुकाअधिकारी स्वप्नील रेड्डी, शिवसेनेचे निखिल डुरे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते व भोकर तालुक्यातील अनेक सोसायटीचे चेअरमन, सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.