कायद्याच्या शिक्षणासाठी प्रवेश घेताय? 243 विधी महाविद्यालयांना बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यताच नाही

मागील काही वर्षात अनेकांचा कायद्याचे शिक्षण घेण्याकडे कल वाढत चालला आहे. मात्र, राज्यातील 243 विधी महाविद्यालयांना (Law College) बार कौन्सिल ऑफ इंडियाची (The Bar Council Of India) मान्यताच नसल्याचे समोर आले आहे.

मुंबईसहित महाराष्ट्र राज्यात 316 महाविद्यालयांमध्ये विधी शिक्षण दिले जाते. परंतु 243 महाविद्यालयात बार कौन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता किंवा परवानगी नुतनीकरण झाले नसल्याची बाब समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते (RTI Activist) अनिल गलगली (Anil Galgali) यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अशा महाविद्यालयात प्रवेश बंद करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील मुंबई विद्यापीठ, टिळक विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अमरावती विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अशा विद्यापीठाच्या अंतर्गत 316 पैकी फक्त 71 महाविद्यालयांकडे बार कौन्सिल ऑफ इंडियाची परवानगी आहे. तर, दोन महाविद्यालये बंद आहेत.

नामांकित असलेले गव्हमेंट लॉ कॉलेज, जितेंद्र चौहान लॉ कॉलेज, केसी लॉ कॉलेज, पद्मश्री डीवाय पाटील लॉ कॉलेज, सिद्धार्थ लॉ कॉलेज, डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज, न्यू लॉ कॉलेज, रिझवी लॉ कॉलेज, एसएनडीटी लॉ कॉलेज, टिळक लॉ कॉलेज, मॉडर्न लॉ कॉलेज सिंबायोसिस लॉ कॉलेज, अंजुमन इस्लाम लॉ कॉलेज, बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज या विधी महाविद्यालयांकडे परवानगी आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच उच्च व तंत्र शिक्षण सचिव यांस लेखी पत्र पाठवले आहे. बार कौन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता नसलेल्या किंवा परवानगी नुतनीकरण नसल्यास त्या महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियापासून मज्जाव करण्याची मागणी गलगली यांनी केली आहे. सध्या बार कौन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता नसलेल्या किंवा परवानगी नुतनीकरण नसलेल्या विधी महाविद्यालयावर दंडात्मक कारवाई करत मान्यता रद्द करण्याची आवश्यकता असल्याचे गलगली यांनी नमूद केले आहे. खरे पाहिले तर मुंबई विद्यापीठ किंवा अन्य विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व विधी महाविद्यालयाची प्रत्येक शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी सर्व कागदपत्रे आणि परवानगीची माहिती संकलित करण्याची गरज आहे. विशेष करुन बार कौन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता नसलेल्या किंवा परवानगी नुतनीकरण केल्याचे कागदपत्रे प्रत्येक महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केल्यास विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीस सत्य परिस्थिती लक्षात येईल, असेही गलगली यांनी म्हटले आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला