उत्तराखंड राज्यातील नैनिताल जिल्ह्यातून हनी ट्रॅपची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुलरघाटी परिसरात राहणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणीने नशा करण्यासाठी पैशांची गरज भागवण्यासाठी तरुणांना आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यांच्या संपर्कामुळे तब्बल 20 जण HIV पॉझिटिव्ह झाले आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. रामनगरमध्ये गेल्या पाच महिन्यांतच 19 जणांना HIV संसर्ग झाल्याचे आढळले असून, यामध्ये 15 महिलांचा समावेश आहे.
मुलीचा नशेच्या आहारी गेलेला प्रवास
गुलरघाटी परिसरात राहणारी ही 17 वर्षीय मुलगी नशा करण्याची आदी झाली होती. ती ड्रग्जच्या आहारी गेल्याने पैशांची गरज भासू लागली, ज्यासाठी तिने एक धोकादायक मार्ग निवडला. मुलांना आकर्षित करण्यासाठी ती त्यांना संपर्क करत असे आणि त्यांना आपल्याशी जवळीक साधण्यासाठी प्रवृत्त करत असे. या कारणामुळे तिच्या संपर्कात आलेल्या अनेक तरुणांना एचआयव्ही संसर्ग झाला.
अवघ्या 5 महिन्यांत 19 जणांना एचआयव्हीची लागण
गेल्या पाच महिन्यांत रामनगर परिसरात 19 जणांना एचआयव्ही संसर्ग झाल्याचे आढळले आहे, आणि त्यामध्ये 20 जणांचा समावेश आहे. हे सर्वजण मुलीच्या संपर्कात आले होते आणि त्यांच्यावर संसर्गाची लक्षणे आढळली. हे प्रकरण उघड झाल्यानंतर प्रशासनाने तपास सुरु केला आहे. या प्रकरणात 30 पुरुष आणि 15 महिलांचा समावेश असून, प्रशासनाने जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
तरुणांवर होणारे परिणाम आणि सामजिक मुद्दे
संसर्ग झालेल्या तरुणांमध्ये विवाह झालेल्यांचा समावेश असल्याने त्यांच्या पत्नींना देखील एचआयव्हीची लागण झाली आहे, त्यामुळे हा मुद्दा गंभीर स्वरूपाचा बनला आहे. यामध्ये 15 महिलांना देखील संसर्ग झाला आहे. या प्रकरणामुळे समाजातील असुरक्षितता वाढली असून, नागरीकांना सर्तक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सावधानता आणि जनजागृती
या प्रकरणाने स्थानिक प्रशासनाला सतर्क केले असून, नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. HIV संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने जनजागृतीसाठी विविध शिबिरे आयोजित करण्याचे ठरवले आहे. या सत्रांतून HIV/AIDS संसर्ग, त्याचे परिणाम आणि सुरक्षिततेचे महत्व समजावून सांगण्यात येणार आहे.