जळगावमध्ये 13 हजार मतदारांनी केला नोटाचा वापर

जळगावमध्ये 13 हजार मतदारांनी केला नोटाचा वापर

जळगाव – लोकसभेमध्ये 13919 मतदारांनी नोटाचा वापर करून जळगाव लोकसभेतील 14 उमेदवारांना नाकारले आहे. यामध्ये सर्वाधिक मताधिक्य हे एरंडोल चाळीसगाव व पाचोरा या मतदारसंघातून मिळालेले आहे.

त्यामुळे मंगेश चव्हाण यांनी जो लाखाची आघाडी मिळवून देण्याचा सांगितले होते ते फक्त सोळा हजाराचे लीड देण्यात यशस्वी झाले आहे.

जळगाव लोकसभेमध्ये भाजपचे दरोमदार ही शिंदे सेनेच्या आमदारांच्या विधानसभा क्षेत्रावर अवलंबून होती. असे असताना जळगाव लोकसभेमध्ये मतदारांनी 14 उमेदवारांना नोटाचा वापर करून स्पष्टपणे नाकारले आहे.

येथे झाला नोटाचा वापर

चाळीसगाव 3606

एरंडोल 2444

पाचोरा 2427

जळगाव ग्रामीण 1996

जळगाव सिटी 1864

अंमळनेर 1541 या विधानसभा क्षेत्रामध्ये 13878

टपालीमध्ये 41

एकूण १३९१९ मतदारांनी नोटाचा वापर केलेला आहे

जळगाव लोकसभेतील विधानसभा व इतर मताधिक्याचा विचार केला असता सर्वात कमी मताधिक्य चाळीसगाव येथून 16327, पाचोऱ्यातून 16566, एरंडोल मधून 22085, अंमळनेर मधून 71070, जळगाव ग्रामीण मधून ६३१४० आणि जळगाव सिटी मधून ६१७१८ असे मताधिक्य स्मिता वाघ यांना मिळालेले आहे.

यावरून असे दिसून येते की, भाजपाच्या विद्यमान चाळीसगाव मधून भाजपच्या उमेदवाराला सर्वाधिक कमी मतदान मिळालेले आहे. तर जळगाव सिटी, जळगाव ग्रामीण व अमळनेर मधून सर्वाधिक मताधिक्य राहिले आहे.