सुनसगाव विद्यालयाचा दहावीचा निकाल ९० टक्के !

भुसावळ – दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयचा इयत्ता दहावीचा शाळेचा निकाल ८९.२८ टक्के लागलेला असून शाळेतील प्रथम क्रमांक कु .पाटील अश्विनी गोपाळ ९१ टक्के , द्वितीय क्रमांक कु.शिरसाळे कोमल चंद्रकांत ९०टक्के तर तृतीय क्रमांक कु. सावकारे रूपाली दीपक ८६ टक्के , कु .काटे ललिता हेमराज हीस ८६ टक्के ,चतुर्थ क्रमांक कु. सपकाळे उज्वला अशोक ८५ .६० टक्के तर पाचवा क्रमांक -पाटील हेमराज प्रशांत ८५.४० टक्के मिळून उत्तीर्ण झाले आहेत .

एकूण ५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत.

वरील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन श्री . आर . डी . पाटील सर , व्हा .चेअरमन श्री . हरी पाटील व सर्व कार्यकारी संचालक मंडळातील सदस्य शाळेचे मुख्याध्यापक जे .पी . सपकाळे सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे .