रणबीर कपूरचा पुढाकार, ‘आदिपुरुष’ची 10 हजार तिकिटे मोफत वाटणार

दिग्दर्शक ओम राऊतचा बहुचर्चित चित्रपट ‘आदिपुरुष’ येत्या 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास, क्रीती सेनन, सैफ अली खान, सनी सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गरीब मुलांना हा चित्रपट पाहता यावा यासाठी ‘आदिपुरुष’ची 10 हजार तिकिटे अभिनेता रणबीर कपूर मोफत वाटणार आहे.

रणबीरच्या या कृतीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याआधी ‘द कश्मीर फाईल’ आणि ‘कार्तिकेय 2’चा निर्माता अभिषेक अग्रवाल यांनी 10 हजार तिकिटे दान केली आहेत. गरीब मुले, अनाथालय, वृद्धाश्रम यांच्यासाठी ही तिकिटे दान करण्याचा निर्णय अभिषेक अग्रवालने घेतला आहे.

ताजा खबरें