शेतकऱ्यांना स्वस्त युरिया देण्यासाठी 10 लाख कोटींचं अनुदान, 3 हजार रुपये किमतीचा युरिया शेतकऱ्यांना 300 रुपयात : पंतप्रधान

शेतकऱ्यांना स्वस्त युरिया देण्यासाठी 10 लाख कोटी रुपयांचे अनुदानाची तरतूद केली असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी केलं.

युरियाच्या एका पिशवीची किंमत तीन हजार रुपये असताना, शेतकऱ्यांना तो 300 रुपयांना उपलब्ध करून दिला जात असल्याचे मोदी म्हणाले. देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण केलं. यावेळी त्यांनी ही माहिती सांगितली.

जागतिक बाजारपेठेत शेतकऱ्यांना 3 हजार रुपयांपेक्षा जास्त दराने युरिया विकला जात आहे. ज्या युरियाची पिशवी काही जागतिक बाजारपेठेत 3 हजार रुपयांना विकली जाते, तोच युरिया आता सरकार आपल्या शेतकर्यांना 300 रुपये दराने विकते. सरकार आपल्या शेतकऱ्यांसाठी युरियावर 10 लाख कोटी रूपयांचे अनुदान देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला संबोधीत केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. मी तुमच्यातून आलोय,तुमच्यसाठी जगतोय. मी स्वप्न देखील तुमच्यासाठी पाहतोय. मी कष्ट करतोय ते देखील तुमच्यासाठी करत आहे. तुम्ही मला ही जबाबदारी दिली म्हणून मी हे करत नाही तर हा देश माझे कुटुंब आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबातील सदस्यांना दु:ख झालेले मी पाहू शकत नाही असेही मोदी म्हणाले. आमच्यासाठी नेशन फर्स्ट असल्याचे ते म्हणाले. दरम्यान पुढील वर्षी पुन्हा लाल किल्ल्यावरून भाषण करणार असल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदींनी सलग 10 वर्षे झेंडा फडकावून देशाला संबोधित केलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. पंतप्रधान मोदी हे देशातील चौथे पंतप्रधान आहेत, की त्यांनी सलग दहा वर्षे झेंडा फडकावून देशाला संबोधित केले आहे. यापूर्वी पंडीत जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग यांच्या नावावर हा रेकॉर्ड होता. जवाहरलाल नेहरु यांनी 17 वेळा देशाला संबोधित केले आहे. त्यांच्या सर्वाधिक वेळ लांबलेल्या भाषणाचा कालावधी 72 मिनिटे इतका होता. इंदिरा गांधी यांनी 16 वेळा तर मनमोहन सिंग यांनी 10 वेळा झेंडा फडकावून देशाला संबोधित केले आहे. मनमोहन सिंह यांनी दहावेळा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. त्यांच्या सर्वाधिक वेळ लांबलेल्या भाषणाचा कालावधी 50 मिनिटे इतका होता.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी