ऐन दिवाळीत सर्वसामान्य एसटी प्रवाशांचे दिवाळे निघणार असल्याचे निश्चित झाले आहे. दिवाळीतील वाढत्या प्रवाशांची दखल घेत महामंडळाने आपल्या भाडय़ात तब्बल 10 टक्क्यांची हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ 8 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत लागू असणार आहे.
एसटीच्या तुलनेत खासगी बसचालकांकडून अवाचेसवा प्रवास भाडे आकारले जात असल्याने सणासुदीच्या काळात प्रवासी एसटी प्रवासाला पसंती देतात. सध्या एसटीने दररोज सुमारे 50 लाख प्रवासी प्रवास करत असून त्यामध्ये दिवाळीत मोठी वाढ होते. त्याची दखल घेत प्रवासी वाढीच्या काळात हंगामी भाडेवाढीच्या माध्यमातून आपली तिजोरी भरण्याचा निर्णय आत एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार दहा टक्क्यांची भाडेवाढ जाहीर केली आहे. ही भाडेवाढ 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.