राज्यातील ७० तहसीलदारांच्या बदल्या

राज्यातील ७० तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश महसूल विभागाने काढले आहेत. त्यानुसार जळगावला दोन तर नंदुरबार जिल्ह्यात तीन अधिकाऱ्यांना रुजू होण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यातील अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दंडाधिकारी म्हणून अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनात आता तीन जणांना अधिकार प्राप्त झाले आहेत.

तहसीलदार संतोष बाळशिराम डेरे यांची सरदार सरोवर प्रकल्प, विनायक गोपीनाथ घुमरे यांना तहसीलदार अक्कलकुवा, उमा सदाशिव ढेकळे यांना संजय गांधी योजना जळगाव, जगदीश सांडूआप्पा भरकर यांना महसूल विभाग नंदुरबार व ज्योती रामसिंग वसावे यांची जळगाव जिल्हा करमणूक कर अधिकारी म्हणून नेमणूक देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने मंगळवारी, एक आदेश काढून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दंडाधिकारी म्हणून अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांपाठोपाठ आता जिल्हा प्रशासनात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तीन दंडाधिकारी सेवेत असणार आहेत. राज्यभरात दंडाधिकारी म्हणून शंभरावर अधिकाऱ्यांना अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे विविध विभागातील सुनावण्यांना आता वेग मिळणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाचे उपसचिव चेतन निकम यांनी आदेश काढले आहेत.

ताजा खबरें