कुऱ्हा पानाचे शेती शिवारातून केबल चोरी ?

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे शिवारातील शेतातून चोरट्यांनी १४,४०० रुपये किंमतीची तांब्याची केबल अज्ञात चोरांनी लांबवली आहे.

या बाबत माहिती अशी की, प्रकाश यशवंत पाटील रा.कुऱ्हा पानाचे ता भुसावळ यांच्या शेतातील इलेक्ट्रिक पंपाची तब्बल ४८० फूट तांब्याची केबल अज्ञात चोरांनी दि २० ते २१ जानेवारी दरम्यान लांबवली. घटना समजताच शेतकऱ्याने भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. घटनेचा तपास कुऱ्हा पानाचे बीट हवालदार युनूस शेख पुढील तपास करीत आहेत.

ताजा खबरें